
आज आ.रोहीत दादा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोकणगाव मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल येथून प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी प्रथम मारुती मंदिर , तुळजाभवानी मंदिर , विठ्ठल मंदिर , ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आणि नंतर खंडोबा मंदिर महादेव मंदिर , जोतिबा वाडी , मारुती मंदिर आदी सर्वच ठिकाणी नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला
यावेळी बोलताना सर्वांनी आ.रोहीत दादा पवार यांच्या विजयाचा संकल्प करत आ.रोहीत दादांचे नेतृत्व हे सर्व घटकांना सामावून घेणारे असून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे . आ.रोहीत दादांच्या विजयासाठी त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा संकल्प करत डोअर टू डोअर प्रचार करत आ.रोहीत दादा यांची विकासकामे हे सर्वसामान्य जनता ,ग्रामस्थ यांना सांगण्यात येणार आहे . आ.रोहीत दादा हेच मतदारसंघाचे भूमिपुत्र असून ते येणाऱ्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून शपथ घेतील असा निर्धार सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सभेची सांगता जोतिबावाडी चे ग्रामदैवत ज्योतिबा मंदिर येथे सांगता झाली .यावेळी युवक कार्यकर्त्यांनी ” राम कृष्ण हरी , वाजवा तुतारी ” , एकच वादा , रोहीत दादा , रोहीत दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी युवक कार्यकर्ते , पदाधिकारी , ज्योतिबावाडी आणि कोकणगाव ज्योतिबावाडी आणि कोकणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .







