
कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी जलालपुर मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे अनिल गावडे प्रतिक्रिया दिली. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आ.शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत असे ते यावेळी म्हणाले.
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी महादेव मंदिरासाठी सभामंडप पेव्हर ब्लॉकचे काम व ग्रामपंचायत ऑफिस पासून ते महादेव मंदिर रस्ता रस्ता केला तसेच मारुती मंदिरापाशी एक सभा मंडप असे अनेक सभामंडप ठिकठिकाणी दिलेले आहेत .त्यामुळे जलालपुर गावची शोभा वाढली. तसेच जलालपूर ते शेडगाव फाटा हा डांबरीकरण रस्ता केला आहे तसेच सिद्धटेक फाटा ते जलालपूर तेही शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काम झालेले असल्याने दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला . तसेच दुधोडी बेरडी सिद्धटेक जलालपूर हा रस्ता आ.प्रा.राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे . शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विम्याचे पैसे भेटले असल्याने शेतकरी खुश आहेत. लाडकी बहीण योजनेचा गावातील असंख्य महिलांना लाभ भेटलला असून लाडक्या बहिणी मतदान रुपी आशीर्वाद आ.प्रा.राम शिंदे साहेब यांना देतील. तसेच वाड्यावर रस्त्यांची काम केलेले आहे . पवार मळ्यातील डांबरी रस्ता हेही आ.प्रा.शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तसेच खेडकर वस्ती याही ठिकाणी दहा लाख रुपयाचा रस्त्यासाठी निधी व रस्ता मंजूर आहे . तसेच लाईटच्या सोय केल्या तसेच काळे वस्तीवरील लवकरात वाड्यावरती अडीच कोट रुपयाचा बंधाऱ्याचे कामही पूर्ण केलेला आहे जलालपूर ते ताजु हा रस्ता मंजूर झालेला आहे .
आ.रोहित पवार यांनी कोणताही विकास केलेला नसून कंपास पेटी , सायकल , टी-शर्ट असे सामान्य नागरिकांची दिशाभूल करून कुठलाही विकास केलेला नाही. टी-शर्ट वाटल्याने कुठला विकास होत नाही तसेच रोहित दादांनी सायकल दिलेल्या त्या पण ज्या वेळेस राम शिंदे यांनी रोडची काम केली त्या रोडवरनं त्या सायकली धावतच आहेत . आता जनतेने आता दाखवून द्या विकास कशाला म्हणतात . आ.रोहित दादांनी जेवढे आश्वासन दिले त्यातले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही मुलांना रोजगार देतो म्हणले , ड्रायव्हिंग लायसन देतो म्हणले कुठल्याही प्रकारचा रोजगार दिलेला नाही व कुठल्याही प्रकारचं लायसन दिलेले नाही .
आ.पवार म्हणाले होते कर्जत जामखेड या दोन तालुक्याची मी बारामती करून दाखवीन असे आश्वासन त्यांनी दिले होते तेही त्यांनी पूर्ण केलेले नाही अशी सामान्य जनतेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे त्यामुळे रोहित पवार यांचे पार्सल बारामतीला पाठवल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.







