
समाजातील सर्वसामान्य घटक असलेले शेतकरी , कष्टकरी व बळीराजाच्या समृद्धीसाठी ही निवडणूक लढवत असून या सर्व घटकांसाठी येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रक या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन करण भाऊ चव्हाण यांनी केले आहे .
कर्जत जामखेड मतदार संघातील शेतकरी , कष्टकरी , दलित , शोषित , वंचित असलेल्या समाज घटकांचा विकास हेच उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या समाज घटकांना घरकुले , वैयक्तिक लाभाच्या योजना , पीक विमा , जलसंधारण , विहीर अनुदान , कुकडी भूसंपादनाचा मोबदला , नियमित वीजपुरवठा , मनरेगाच्या माध्यमातून रोजगार , तूर, कांदा , कापुस हमीभाव केंद्र , तीर्थ क्षेत्र विकास , अटल भूजल योजना , ठिबक सिंचन अनुदान वाढ ,नाबार्ड मार्फत जलसंधारणाची कामे , मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना , मृत ओढयांचे पुनरुज्जीवन , पाझर तलाव खोलीकरण , कुकडी , सिना पाणी नियोजन , भोसे खिंडीतून सिना धरणात पाणी , कोल्हापुरी बंधाऱ्यांची लातूर टाईप बॅरेज मध्ये रुपांतराला मंजुरी आणि महत्त्वाचे म्हणजे भूमिहीन समाज घटकाला गायरान जमिनी वरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करणार आहे . अशा या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वांनी माझ्यामागे आपली ताकद उभी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले . शेतकरी , कष्टकरी , दलित , शोषित आणि वंचित घटकांमध्ये सतत संपर्क ठेवनार असून त्यांच्या या कार्याचा वसा आपण पुढे नेत असून माझ्या राजकीय यशामध्ये या सर्वसामान्य दीनदलित शोषित आणि वंचित जनतेचा मोठा वाटा राहणार आहे असे ते यावेळी म्हणाले .







