माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब यांना बेर्डी मधून लीड देणार : अमोल भोसले 

Google search engine

माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब यांना बेर्डी मधून लीड देणार असून कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी बेर्डी मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे अमोल भोसले यांनी सांगितले.तसेच भारतीय जनता पार्टी , बेर्डी येथील युवा कार्यकर्ते , पदाधिकारी साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे सिद्धटेक मधील विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही अमोल भोसले यांनी दिली.आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी महादेव मंदिर सभा मंडप , अष्टविनायक पैकी एक असलेले श्री.सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसर सुशोभीकरण व विकास , मंदिर ब्लॉक , गावाअंतर्गत सिमेंट रस्ते रोड आदी विकासकामे दिली.  अधिकाऱ्यांना फोन करताच कामे झालेच अशी ख्याती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे.