माजी मंत्री आमदार , भूमिपुत्र राम शिंदे साहेब यांच्या विजयाची औपचारिकता बाकी: भाऊसाहेब गावडे , भटक्या विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष 

Google search engine

 

माजी मंत्री आमदार, भूमिपुत्र प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे प्रतिपादन भाऊसाहेब गावडे , भटक्या विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांनी केले .आपल्यातला आपली भावना जानणारा आपला माणूस प्रा.आ.राम शिंदे साहेब हेच आहेत. कर्जत तालुक्यात आ.राम शिंदे साहेब यांना जोरदार समर्थन मिळत असून त्यांचा विजय निश्चित आहे. तालुक्यातील सर्वच गावांतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या गळ्यातील ताईत आ.राम शिंदे साहेब बनले आहेत.

एकनिष्ठ कार्यकर्ता आणि समाज “जी व्यक्ती सामान्य जनता शेतकरी, गरीब वर्गाचे नेतृत्व करते, अशा व्यक्तीला नेता म्हणतात. युवकांची माथी भडकून त्यांना वाईट मार्गाला लावणे हे काम काही जण करतात त्यामुळे येणाऱ्या पिढीने योग्य माणूस निवडावा , गेल्या वेळी जे युवक त्यांच्या बरोबर गेले होते त्यांची आज काय भावना आहे हे सुध्दा पडताळणी करून पहावे अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली .

जे विद्यमान आमदार जन्माच्या वेळीच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत त्यांच्याकडून काय गोरगरीबच्या गरिबीची , कष्टकऱ्यांच्या कष्टाची , शेतकऱ्यांची शेती विषयीची कशी जाणीव असणार ,ज्यांनी कधी गरिबी पहिलीच नाही फक्त घरातल्याच्या भाषणात फक्त गरिबी ऐकली आणि फक्त आजोबा आत्याच्या भाषणातली गरिबी ऐकून मोठे झालेले युवराज हे आता फक्त भाषणातून गरिबीची जाणीव असल्याची दाखवतात पण आ.राम शिंदे साहेब यांच्या वडिलांनी कित्येक वर्ष साल घातली त्यांना गरिबीची जान आहे . गरिबी काय असते भोगली अनुभवली लोकांच्या हाल अपेष्टा काय असतात त्या अनुभवल्यात गोरगरिबांच्या सामान्य शेतकरी वर्गातील , सामान्य कुटूंबातील असामान्य नेतृत्व कसे निर्माण होते याचं आदर्श उदाहरण म्हणजे प्रा.राम शिंदे सर . समाजाला जर योग्य दिशा दयायची असेल तर प्रत्येक गावात शेतकरी वर्ग, गोरगरीब, बहुजन, कष्टकरी निराधार महिला वर्ग, युवक वर्गाचे व्यवस्थित संघटन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सर्व वर्गामधून नेतृत्व निर्माण करण्याचे काम प्रा.आ.राम शिंदे साहेबांच्या रुपाने घडत आहे. या संदर्भात राम शिंदे साहेब नेहमीच सांगतात राजकारणात तरुण वर्ग आल्याशिवाय राजकारणाची दिशा बदलणार नाही माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील अनेक युवकांना राजकीय क्षेत्रातील आवड निर्माण करुन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांची जोड कशा पद्धतीने असते.याबद्दल ईतर नेत्यांपेक्षा त्यांची भूमिका सतत मी अनुभवत असतो त्यावर अनेक नेते मंडळींनी चिंतन करायला हवे. राम शिंदे साहेब नेहमीच म्हणतात, “येणाऱ्या पिढीतील राजकारणात विद्वेतेची गरज भासत असते . आजच्या राजकारणात , समाजकारणात विद्वानांची त्यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत आहे. आजचे राजकारण , समाजकारण हे आंधळ्यांच्या माळेच्या हाती गेले आहे, ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे.” पुढारी कसा असावा या संदर्भात भाष्य करतांना साहेब नेहमी सांगतात, “पुढारी खराखुरा मार्गदर्शक असावा, तो स्वार्थी नसावा, दुस-याच्या ओंजळीने पाणी पिणारा नसावा,

भाडोत्री कामे करणारा नसावा, तो दिशाभूल करणारा नसावा, नकली पुढाऱ्यांची संख्या तुम्ही वाढविता कामा नये.”जो लोकांचे नि:स्वार्थ बुध्दीने काम करतो,सर्वसामान्य माणसांसाठी झटतो, तो खरा नेता असतो.नेत्याजवळ दूर दृष्टिकोण असायला हवा.भविष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्याच्याजवळ असली हवी.त्याचे चारित्र्य निष्कलंक असायला पाहिजे.नेत्याला वास्तविक सामाजिक भान असणे गरजेचे आहे.

ज्याला समाजाचे नेतृत्व करावयाचे आहे, त्याने समाजाचा मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय या दोन्ही अंगानी चांगला अभ्यास करायला हवा. नेतृत्वामध्ये दातृत्व, मातृत्व आणि कर्तृत्वाचे गुण असले पाहिजे.

नेत्यांत सर्वात महत्वाची बाब म्हणजे समाजाचे नेतृत्व करतांना त्याने डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर अशी भूमिका बजवयाला हवी .नेत्यांनी भारतीय संस्कृतीमधील इतिहास आत्मसात करायला हवा.आपल्या वाणीवर उत्तम संस्कार करावयला हवा.मनाचा समतोलपणा साधल्यास नेतृत्व यशस्वी होण्यास मदत होऊ शकते.आदर्श समाज निर्मितीसाठी जशी समाजातील कुशल नेतृत्वाची गरज असते, तशीच अनेक कार्यकर्त्यांची सुध्दा गरज असते. समाजामध्ये जर रचनात्मक आणि विधायक कार्य करावयाचे असेल तर, नेता आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य आणि समन्वय साधणे फार गरजेचे आहे.

नेतृत्व करणा-या व्यक्तीने समाजाला योग्य दिशा दाखवायची असते. नेत्याचे दिशा – दिग्दर्शन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते. नेता म्हणजे विचारशक्ती असतो . ही विचारशक्ती समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचविणारा घटक म्हणजे कार्यकर्ता असतो .कार्यकर्त्यांशिवाय नेतृत्व प्रभावी ठरु शकत नाही. तसेच भरपूर कार्यकर्ते असूनही जर योग्य दिशा देणारे नेतृत्व नसेल तर, कार्यकर्त्यांचे अपार कष्ट सुध्दा वायफळ ठरतात. नेत्याला सम्यक ध्येय समोर ठेवावे लागते.

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रभावी विचार समाजासमोर मांडावा लागतो.हा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्याना करावे लागते. यावरुण हे सिद्ध होते की, नेता आणि कार्यकर्ता हे राजकीय चळवळीचे दोन प्राण आहेत.या दोन्हीपैकी एकाचाही अभाव असेल तर, राजकीय चळवळ यशस्वी होऊ शकत नाही.

नेतृत्वाची चळवळ ही सत्यावर आधारलेली, खऱ्या अर्थाने लोकांचे कल्याण करणारी चळवळ असते .

ती यशस्वी होण्यासाठी तिला सुयोग्य नेतृत्वाची आणि प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांची नितांत गरज असते . घराणेशाहीतून राजकारणात लॉंचिंग झालेला नेता होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला नेतृत्वाच्या विचारांचा चांगला अभ्यास असणे, फार गरजेचे आहे. धडा शिवाय मनुष्य जसा निरर्थक असतो .तसेच नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते पण जर कार्यकर्त्यांना साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची वागणूक दिली तर काय होते आज काल दिसतेच की आणि २३ तारखेला निकालातूनही दिसेल.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना राम शिंदे नेहमीच म्हणतात,” राजकारण वाईट नाही, राजकारणात चांगले युवक आल्याशिवाय राजकारण चांगले होणार नाही . या ठिकाणी समाजाच्या कामासाठी निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांनी devoted workers हा शब्द प्रयोग केला आहे. कार्यकर्त्याला समाज सेवकाची प्रामाणिक भूमिका पार पाडावी लागते . समाजातील लोकांना आपल्याकडे आलेला कार्यकर्ता हा त्यागी वृत्तीचा समाजकार्याची आवड असणारा आहे, तो आपल्याला फसविणार नाही याची खात्री पटायाला हवी .शेवटी आपल्यातला आपली भावना जानणारा आपला माणूस राम शिंदे साहेबचं आहे.