४० दिवस मतदार संघात फिरून स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेणाऱ्यांना धडा शिकवा : अभंग बोरुडे , ता.उपाध्यक्ष युवक , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

Google search engine

 

 

जनतेच्या मनावर राज्य करण्यासाठी जनतेची ईमान इतबारे सेवा पाच वर्ष अविरत सेवा करावी लागते ,४० दिवस फिरून जनतेच्या मनात विष पेरून राजकारण होत नसते.अशांना धडा शिकवण्याची मागणी मतदार राजाला मा .सरपंच अभंग बोरुडे , युवक तालुका उपाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केली आहे.

ते यावेळी बोलताना म्हणाले की , ज्या वेळेस कर्जत जामखेड मतदार संघात शालेय विद्यार्थी ४-५ किलोमिटर चालत होते तेव्हा भूमिपुत्र म्हणणारे कुठे गेले होते.ब्रिटिश काळातील शाळा अंगावर पडून विद्यार्थी जखमी होयची वेळ आली तेव्हा कुठे गेले भूमिपुत्र , मिरजगाव मधून धूळ उधळीत जाणारे ट्रक, जीव मुठीत धरून चालणारे नागरिक तेव्हा कुठे होते भूमीपुत्र , मिरजगाव परिसरातील व माझ्या मतदार संघातील गोरगरीब माणूस , आरोग्य सेवेपासून आर्थिक अडचणीमुळे वंचित राहू नये म्हणून १३.५० कोटींचा उपजिल्हा रुग्णालय आणले , शेतकऱ्यांचा माल दीर्घकाळ साठवण्यासाठी गोडाउन ची उभारणी केली.राजकरण करताना पाऊल गुण चांगला असावा लागतो ,गेली पाच वर्षात सिना धरण पोटचारी अपूर्ण होती तेव्हा आ.रोहित दादा पवार यांनी स्वखर्चाने जेशीबी लावून चारीतील झाडे झुडपे , गाळ काढला.त्यामुळे टेल टू हेड पाणी पोहचले.त्यामुळे आज मिरजगाव परिसरातील शेतकरी सधन झाला . कोरोना काळात आ.रोहित दादा गरिबांची सेवा करत होते , तेव्हा कुठे होते भूमिपुत्र .

आ.रोहित दादा पवार यांच्या वरती वैयक्तीत टीका होते की , स्टील,सिमेंट, खडी , बारामती वरून आणलेत पण याचा उपयोग मतदार संघातील कामे होताना दिसत आहे. तुम्ही मंत्री असताना जलसंधारण ची कामे होत असताना टक्केवारी कुठे जात होती , याचे आरोप तुमच्यावर होतात त्याचे तुम्ही उत्तर आणखी दिले नाही .