
माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र असून मलठण मधून त्यांना मोठे लीड देणार असल्याचा निर्धार तुळशीराम कारंडे किसान मोर्चा कार्यकारिणी सदस्य , कर्जत यांनी व्यक्त केला.
यावेळी डाँ.सुरेश भिसे मा. उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , कर्जत , डॉक्टर सुधीर माने , स्वप्निल भिसे , विलास नाना परदेशी , संभाजी दळवी ,बाळासाहेब घेणे , डाँ.दत्ता माने , रामदास माने , रोहित भिसे, राहुल शेळके, अशोक खरात,बापू टकले,प्रतीक भिसे,भागवत कोल्हटकर,प्रदीप भिसे, आबा खरात , प्रशांत भिसे,संदीप कोल्हटकर,तुषार भिसे,स्वप्नील भिसे,दीपक टकले आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री प्रा .राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.जलजीवन मिशन अंतर्गत वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा झाला त्यामुळे भगीणींच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला. ‘शाश्वत विकास’ काय असतो हे शिंदे साहेबांनी आपल्या ‘मंत्रिपदाच्या’ कार्यकाळात दाखवून दिले. जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी शिवारांना ‘जलसमृद्ध’ केले,शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या,जलयुक्तची दखल केवळ राज्य नाही तर केंद्र पातळीवर घेतली गेली.याचा आम्हाला अभिमान आहे.जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कर्जत जामखेड व राज्यालाही झाला व होत आहे.
रस्ते क्राँकिटकरन, बंधारे , डांबरीकरण ,जलयुक्त शिवार, विविध ठिकाणी सभा मंडप, अंतर्गत रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे कार्यसम्राट आमदार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .







