
२०२४ विधानसभेला कार्यसम्राट आ.रोहित दादा पवार साहेब हेच कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार होवून राज्याचे मंत्री होतील अशी प्रतिक्रिया मा. सरपंच संतोष नलवडे यांनी दिली. आ .रोहित दादा यांच्यासाठी कर्यार्ते अहोरात्र मेहनत घेत असून ते विक्रमी मतांनी विजयी होतील. कोरेगाव गटातील धांडेवाडी, कुंभेफळ, अळसुंदे , निंबे , आंबिजळगाव, डोंबाळवाडी, माळंगी, शेगुड , नेटकेवाडी, कापरेवाडी , खातगाव, बजरंगवाडी,लोणी मसदपुर, सटवाईवाडी, सोनाळवाडी आदी गावांतून तालूक्यात एक नंबरचे लीड देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ.रोहित दादा पवार यांनी मतदार संघातील युवकांना पाठबळ देताना त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.मतदार संघाचा कायापालट झाला तो फक्त आ .रोहित दादा यांच्यामुळेच .यावेळी बोलताना ते म्हणाले की , आम्ही गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून आदरणीय रोहित दादांवरती प्रेम करणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते यांनी कर्जत तालुक्यातील ११६ गावांना भेटी देऊन प्रत्येक गावातील विकास कामाबद्दल जनतेत जाऊन चर्चा केली असता अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने जनतेचा पाठिंबा आणि प्रेम आदरणीय रोहित दादांना मिळत आहे.
एकूणच कोरेगाव गन आणि गटातून तालुक्यातील सर्वात जास्त लीड या निमित्ताने मिळणार आहे. आ.रोहित दादांनी , सेंट्रल बिल्डिंग , सर्व कार्यालय एकत्रित असलेली १०० बेडचे सुसज्ज अद्ययावत शासकीय हॉस्पिटल , पंचायत समिती: वरचा मजला सर्व विभागाचे एकत्रीकरण ,कोर्टाचा वरचा मजला, ऑक्सीजन प्लांट अत्यावश्यक सेवा , नगरपंचायतची अद्यावत व सुसज्ज इमारत , व्यावसायिकांना नगरपंचायत चे १०९ गाळे , श्री. संत सदगुरु गोदड महाराज भक्तांना भक्ती निवास, अद्ययावत शासकीय रेस्ट हाऊस , पोलीस कर्मचारी वसाहत , शासकीय आरोग्य कर्मचारी वसाहत , बस डेपो, वर्कशॉप इमारत व व्यावसायिक गाळे , ५ भागात सिंगल फेज डीपी , मा.रोहीत दादांनी या इमारती सोबतच शिक्षण, आरोग्य, कोरोना काळात सुद्धा दोन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारून जनतेची सेवा करण्याचे काम रोहित दादा पवार यांनी केले.अंगणवाडी मध्ये आधुनिक खेळातून शिक्षण मिळेल अशी खेळणी,प्राथमिक शाळेत डिजिटल क्लास रूम, माध्यमिक शाळेत विध्यार्थ्यांना वाडी वस्ती वरून शाळेत जाण्या-येण्यासाठी दर्जेदार सायकली,वयोवृद्धा साठी वेगवेगळ्या आरोग्य सुविधा, डोळ्यांची ऑपरेशन ही सुद्धा कामे केली.आ.रोहित दादांनी कर्जत जामखेड ची ओळख निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून रोल मॉडेल बनवण्याचा त्यांनी गेली ५ वर्षांपासून प्रयत्न केला.खोळंबलेल्या विकासकामांना त्यांनी चालना दिली. त्यांनी मतदार संघात कुठलाही जात,धर्म,पंथ, पक्ष न बघता प्रामाणिकपणे विकासकामे केली.सर्व समस्या वैयक्तीत पातळीवर मिटवल्या व कर्जत जामखेड विकासाच्या मार्गावर असणारा मतदारसंघ अशी हळू हळू ओळख निर्माण केली.कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत आमदार रोहित दादा पवार आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेड मतदार संघामध्ये त्यांनी कोट्यवधीची विकासकामे केली. जलसंधारण, पाणीपुरवठा, अशी अनेक विकासकामे करत आ.रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघात विकास गंगा आणली. आ.रोहित दादा पवार हेच २०२४ विधानसभेला कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या बळावर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना त्यांनी दिली.
आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार राहनार असून कोट्यवधींच्या विकासकामांतून आ. रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली .
यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार यांनी क कर्जत जामखेड मतदार संघाची राज्यात आदर्श मतदार संघ म्हणून ओळख निर्माण केली आहे .
गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे ४३ हजार मतांनी निवडून आले . त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न त्यांनी सोडलवे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी १४ हजार सायकल वाटप ,मोफत आरोग्य तपासणी शिबिर , अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या त्या रोहित दादा यांच्यामुळेच सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे युवा व्यक्तिमत्व आ.रोहित पवार हेच २०२४ चे कर्जत जामखेड चे विधानसभेचे आमदार असतील
राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेड एमआयडीसी होईल व येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली .







