
कर्जत जामखेड मधील सुजाण मतदारांनी आ.प्रा.रामजी शिंदे साहेबांना मतदान करून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करून विक्रमी मतांनी विजयी आवाहन करण्याचे सामाजिक कार्यकर्ते मोहन सायकर यांनी केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले , भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे साहेबांना विधानसभेची उमेदवारी रविवारी जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व वरिष्ठ नेत्यांनी जल्लोष व्यक्त करत आ. राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मोहन सायकर म्हणाले की , राशीन भागात कुकडीच्या पाण्याची गंभीर समस्या होती ती आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या काळात सुरळीत झाली . सर्वसामान्यांना एका फोनवरती आ.प्रा.राम शिंदे साहेब उपलब्ध होतात . एका फोनवरती राशीनला न पोहोचलेले कुकडीचे पाणी शिंदे साहेबांनी मागच्या वर्षीच्या रोटेशन मध्ये सोडले होते. कुकडीच्या पाण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा नेता हे राम शिंदे आहेत
सर्वसामान्य जनतेच्या हृदयात विराजमान झालेले पाणीदार आमदार राम शिंदे साहेब हे नाव आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांनी मंत्री पदाच्या काळात जनतेचा सेवेकरी म्हणून काम केले. त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. ही निवडणुकीसाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , सामान्य जनता कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ, शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे. मतदारसंघातील प्रश्नावर आ.पवार कोणतेही लक्ष घालत नाहीत.
भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा जलसंधारण व इतर कामांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. प्रा .राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी येणारे ३० दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.







