
माजी मंत्री तथा आमदार प्रा .राम शिंदे यांनी रवळगावचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून राहिलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आ.प्रा.राम शिंदे साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन बूथ प्रमुख अशोक जाधव यांनी केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की , आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी रवळगाव सह वाड्या वस्तीवर मोठ्या प्रमाणात निधी देवून मोठ्या प्रमाणात विकास केला . त्याचबरोबर जलयुक्त शिवाराचे योजना राबवली. ही योजना कमालीची यशस्वी झाल्याने या योजनेचा फायदा पूर्ण रवळगाव मधील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढून शेतकरी सुजलाम सुफलाम झाला याचे श्रेय आ. प्रा.राम शिंदे साहेब यांनाच जाते.
महायुती सरकारने सर्व महिलांना २१ व ६५ वयोगटापर्यंत लाडकी बहीण योजना लाभ मिळत आहे त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.
व तसेच शेतकऱ्यांना वीज मोफत केल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . आ.प्रा.राम शिंदे साहेब यांचे रवळगाव वरती विशेष प्रेम आहे असे त्यांनी आपल्या विकास कामाला दिलेल्या निधीतून सर्व गावकऱ्यांना दाखवून दिले आहे.त्यामुळे आ .शिंदे साहेब यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन बूथ प्रमुख अशोक जाधव यांनी केले आहे.






