कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन अटळ  कर्जत जामखेड मतदार संघावर राष्ट्रीय समाज पक्ष चाच झेंडा फडकणार :- तालुका अध्यक्ष सोनु भिसे

Google search engine

 

येणाऱ्या विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष हाच कर्जत जामखेड मतदार संघासाठी पर्याय असून येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार विकास मासाळ यांच्या रूपाने विधानपरिषदेत दिसेल अशी खात्री तालुका अध्यक्ष सोनु भिसे यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी तळागाळातील बहुजन समाजाची मोठ बांधून राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केली. आज राष्ट्रीय समाज पक्षाने संपूर्ण देशात आपले पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. येणाऱ्या ३० दिवसात कर्जत जामखेड मतदार संघात प्रत्येक गावात जावून तेथील प्रलंबित प्रश्न, विकासकामे , सुविधा आदिंकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते , कार्यकर्ते समस्या जाणून घेणार आहेत . गेली कित्येक आमदारांनी मतदार संघातील प्रश्नाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने मतदार संघ विकासापासून कोसो दूर पडला. रस्ते , आरोग्य सुविधा , शिक्षण या मूलभूत सुविधांसाठी मतदार संघातील नागरिकांची फरफट झाली . सध्याच्या आमदारांनी फक्त भूलथापा देत मतदारांना गंडविण्याचे काम केले . परंतु कर्जत जामखेड मतदार संघातील जनता हुशार असून येणाऱ्या काळात त्यांना चांगलाच धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया यांनी यावेळी बोलताना दिली .