कर्जत-जामखेडला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विकास मासाळ यांचे नाव जवळपास निश्चित – महेंद्र कोपनर

Google search engine

 

येणाऱ्या विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष हाच कर्जत जामखेड मतदार संघासाठी पर्याय असून  राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार विकास मासाळ यांच्या रूपाने दिसेल विधानपरिषदेत दिसेल अशी खात्री राष्ट्रीय समाज पक्षाचे महेंद्र कोपनर यांनी दिली.त्यांनी आज पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी वार्तालाप केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी तळागाळातील बहुजन समाजाची मोठ बांधून राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केली. आज राष्ट्रीय समाज पक्षाने संपूर्ण देशात आपले पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. येणाऱ्या काळात कर्जत जामखेड मतदार संघात मतदानापर्यंत प्रत्येक गावात जावून तेथील प्रलंबित प्रश्न, विकासकामे , सुविधा आदिंकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते , कार्यकर्ते समस्या जाणून घेणार आहेत . मागील कित्येक आमदारांनी मतदार संघातील प्रश्नाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने मतदार संघ विकासापासून कोसो दूर पडला. रस्ते , आरोग्य सुविधा , शिक्षण या मूलभूत सुविधांसाठी मतदार संघातील नागरिकांची फरफट झाली . सध्याच्या आमदारांनी फक्त भूलथापा देत मतदारांना गंडविण्याचे काम केले . परंतु कर्जत जामखेड मतदार संघातील जनता हुशार असून येणाऱ्या काळात त्यांना चांगलाच धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया यांनी यावेळी बोलताना दिली .