सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे आ.रोहित दादा पवार हे मोठ्या मतांनी पुन्हा आमदार होतील:- ज्ञानेश्वर हगारे 

Google search engine

सर्वसा

 

सर्वसामान्य कर्जत जामखेड मधील जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे व तसेच कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची देण म्हणून लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघामध्ये प्रचंड मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया सोशल मीडिया कर्जत तालुका सरचिटणीस शरदचंद्र पवार गटाचे ज्ञानेश्वर हगारे यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी वार्तालाप केला. यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत.त्यांनी मतदार संघ हा कुटुंब मानला असून आमदार झाल्यानंतर रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड तालुका सुजलाम सुफलाम बनवला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा कायापालट केला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांच्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. तत्कालीन मंत्र्यांनी कोणतीही विकासकामे न करता फक्त मतापूरता कर्जत जामखेड मधील जनतेचा फायदा घेतला. आज संपूर्ण राज्यात कर्जत जामखेडचे विकासकामांमुळे नाव चर्चेत आहे. आ.रोहित पवार हे मोठ्या मताधिक्यांनी विधानसभा २०२४ ला निवडून येतील यात कोणतीही शंका नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आ.रोहित पवार हे निवडून आल्यानंतर मंत्री बनून कर्जत जामखेड मतदार संघ राज्यात एक नंबर तयार बनवतील. आ.रोहित दादा पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे.

गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे जायंट किलर ठरले .त्यांनी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघाची निवड करत तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव केला.त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न निकाली काढले. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांनी संघर्षाची भूमिका घेत ईडी व इतर दबावतंत्रापुढे न झुकता लढाऊ वृत्ती जपत स्वाभिमानी बाणा जपला .पक्ष फुटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निष्ठा न बदलता जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब यांच्या बरोबर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. युवकांना आ .रोहीतदादांबद्दल प्रंचड विश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.