
दादा पाटील महाविद्यालय कर्जत व वनविभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वन्यजीव सप्ताह २०२४’ निमित्त ‘जैवविविधता छायाचित्र प्रदर्शन व जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून मा. नचिकेत अवधानी यांनी ‘सहजीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उदघाटक अनिल तोरडमल, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सालविठ्ठल, गणेश मिसाळ, हरी सरोदे, मारुती मुळे, संकेत उगले, मोहन शेळके तसेच वनविभाग महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी वृंद, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र करण्यात आलेले होते.
गणेश मिसाळ यांनी नामशेष प्रजातीच्या संवर्धन व जनजागृती करण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन केले जाते. वन्य संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे ‘निसर्ग वाचवा’ असे आवाहन केले. मोहन मोहन शेळके यांनी प्रदर्शनातून वन्य जीवांची माहिती मिळते, त्यामुळे प्रदर्शन पाहिले पाहिजेत असे आवाहन केले. अनिल तोरडमल यांनी वन आणि पर्यावरण संरक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होऊ देऊ नका असे सांगितले.
आजचे प्रमुख वक्ते नचिकेत अवधानी यांनी पृथ्वीवरचे प्राणी आपल्या अगोदर आहे,त वाढत्या शहरीकरणाचा वन्य प्राण्यांना त्रास होत आहे त्यामुळे प्रतिसाद आणि प्रतिबंध यानुसार कार्य केले पाहिजे. सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी त्यांनी माहिती सांगितली. घोणस, नाग, मण्यार, फुरसं हे विषारी साप महाराष्ट्रात आढळतात. तपास १५०० प्रकारचे पक्षी महाराष्ट्रात आढळतात. जागरूक व्हा, अपघात टाळा व पक्षी व वन्य पशूंचा बचाव करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की, निसर्गाने आपल्याला ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा मंत्र दिलेला आहे. निसर्गाची पूजा धर्म म्हणून पाळली पाहिजे. महाविद्यालयामध्ये पर्यावरण रक्षणासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. ग्लोबल वार्मिंगचे धोके लक्षात घेता पर्यावरण संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. निसर्गाचे चक्र हे एकमेकांवर अवलंबून असणारे जीवनचक्र आहे. जगातील सर्वात स्वार्थी प्राणी मनुष्य असल्याचे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
या वन्यजीव सप्ताह निमित्त जैवविविधता छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला दादा पाटील महाविद्यालयासोबत महात्मा गांधी विद्यालय, सौ.सो.ना सोनमाळी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राणशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिग्विजय कुंभार यांनी तर आभार डॉ. प्रितेश गुगळे व सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.






