
पिंपळगाव पिसाचे कार्यकुशल युवा सरपंच श्री.सूर्यजित निवृत्ती पवार यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय युवा आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला त्या बद्दल समस्त ग्रांमस्थांच्या वतीने सरपंच सुर्यजित पवार व उपसरपंच लक्ष्मण इथापे सह सर्व सदस्य मंडळाचे मा.आ.राहुल दादा जगताप पा., डॉ. प्रनोती माई जगताप,ज्येष्ठ नेते नारायणराव पाटिल जगताप, मा.कार्य.संचालक नारायणराव शिंदे,मा.सरपंच प्रमोद नाना जगताप,मा.सरपंच एकनाथराव खामकर,डी एल सरोदे,मारुती भापकर,सुरेश भापकर,संपतराव पवार सर यांनी अभिनंदन केले.
हा राज्यस्तरीय युवा आदर्श सरपंच पुरस्कार निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब पावसे पाटिल,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री.एकनाथराव ढाकणे,हवामान तज्ञ पंजाबराव डख, मा.आ.डॉ.सुधिरजी तांबे यांच्यासह अभ्यासक व्यक्ती या निवड समिती मध्ये सामील होते.त्यांनी सर्व सरपंचाच्या मुलाखती घेऊन त्यामधून अहमदनगर जिल्ह्यातून पिंपळगांव पिसा चे दुसऱ्यांदा सरपंच असणारे श्री.सूर्यजित पवार यांची निवड केली आहे.
सरपंच यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि शांत संयमी स्वभावाने सर्वांचे मने जिंकून गावातील प्राधान्याने प्रा.शिक्षण,आरोग्य,रस्ते, वीज,पाणी,निसर्ग संगोपन असे अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली.त्यांच्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या ग्रामस्थ आनंदी आहेत.विशेष करून त्यांच्या कामाची पद्धत तरुणवर्गात लोकप्रियता मिळवत आहे.






