
श्री गणेश एंटरप्रायजेस & आपले सरकार सेवा केंद्र चे संचालक आणि आरोग्य विमा सल्लागार श्री. सागर सोनमाळी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजना, डिजिटल सेवा, तसेच आरोग्य विमा विषयक मार्गदर्शनाचे मोलाचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या पारदर्शक कामकाजामुळे आणि तत्पर सेवेमुळे नागरिकांमध्ये त्यांनी वेगळा विश्वास संपादन केला आहे. प्रत्येक नागरिकाला आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून देत, त्यांना सुरक्षा कवच देण्याचे कार्य ते अविरत करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, ग्राहक, ग्रामस्थ व हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सागर सोनमाळी यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि व्यवसायात भरभराट लाभो, हीच सदिच्छा!






