महालक्ष्मी हॉस्पिटल, राशीनचे डॉ. नितीन खरात यांचा दिल्लीतील जागतिक लॅप्रोस्कोपी हॉस्पिटलमध्ये दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया कोर्स पूर्ण

Google search engine

 

वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वेध घेत आपल्या कौशल्याचा जागतिक स्तरावर ठसा उमटवत महालक्ष्मी हॉस्पिटल, राशीन येथील युवा व कुशल शल्यचिकित्सक डॉ. नितीन अंकुश खरात यांनी अतिशय उल्लेखनीय यशाची नोंद केली आहे.

दिल्ली येथील प्रतिष्ठित वर्ल्ड लॅप्रोस्कोपी हॉस्पिटलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया’ (Laparoscopic Surgery) कोर्समध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवत अभिमानास्पद कामगिरी साधली.

या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोर्समध्ये जगभरातील ७२ नामांकित डॉक्टर सहभागी झाले होते. शस्त्रक्रियेतील बारीकसारीक तांत्रिक गोष्टी, उच्च कौशल्य, अचूकता, रुग्णसुरक्षा आणि आधुनिक लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानातील प्रावीण्य या सर्व बाबींवर आधारित मूल्यमापनानंतर डॉ.नितीन खरात यांनी ठोस आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला.

एम.एस. पूर्ण झाल्यानंतर केले जाणारे हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आणि कठीण मानले जाते. या कोर्समध्ये मिळालेला हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून राशीन व कर्जत तालुक्याच्या वैद्यकीय सेवांच्या विकासासाठी एक महत्त्वाची पायरी ठरली आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. नितीन खरात म्हणाले—

“आपल्या सर्वांच्या आशिर्वाद व शुभेच्छांमुळे हे नेत्रदीपक यश मिळाले. येणाऱ्या काळात आणखी उत्कृष्ट, आधुनिक आणि परिणामकारक रुग्णसेवा देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अधिक रुग्णांना जलद, सुरक्षित आणि कमी वेदनादायी उपचार देण्याचा माझा विश्वास आहे.”

डॉ. नितीन खरात यांच्या या कामगिरीमुळे कर्जत तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला असून विविध सामाजिक संघटना, सहकारी तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .