
राशीन-सिद्धटेक रोड, बारडगाव सुद्रिक परिसरातील खाद्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्वादिष्ट व परवडणाऱ्या जेवणासाठी ओळखले जाणारे हॉटेल अंबालिका आता ग्राहकांसाठी एक खास आकर्षक योजना घेऊन आले आहे. फक्त 249 रुपयांत अनलिमिटेड मच्छी थाळी ही अतिशय धमाकेदार ऑफर जाहीर करताच कर्जत व इतर तालुक्यातील तसेच परिसरातील खाद्य रसिकांसाठी या थाळीविषयीची उत्सुकता वाढली आहे.
हॉटेलचे संचालक गणेश सुद्रिक यांनी सांगितले की, “एक ग्राहक एक किलो मच्छी खा किंवा दहा किलो खा, आमची थाळी अनलिमिटेड 249 रुपयांत उपलब्ध आहे.
आमच्या हॉटेलचा एकच मंत्र—ग्राहक समाधान. आणि जर चव आवडली नाही तर बिल फ्री… फ्री… फ्री… अशी आमची विशेष हमी आहे.”
या ऑफरमुळे कर्जत , राशीन, सिद्धटेक व आसपासच्या गावांमधील मच्छीप्रेमींसाठी मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. शुद्ध, ताज्या आणि मसालेदार मच्छीच्या स्वादासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल अंबालिकात ग्राहकांची समाधानकारक सेवा हा नेहमीच प्राधान्यक्रम राहिला आहे.
आजपासून ही अनोखी ऑफर सुरू झाली असून, कुटुंबांसह मित्रपरिवारासाठी उत्तम असा हा खाद्यसोहळा आनंद घेण्यासाठी हॉटेलला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. खाद्यरसिकांना एकदा तरी भेट द्या, असा आग्रह संचालक गणेश सुद्रिक यांनी केला आहे.
हॉटेल अंबालिका
राशीन – सिद्धटेक रोड, बारडगाव सुद्रिक
📞 संपर्क : 9860047411
स्वादिष्ट मच्छीच्या चाहत्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा ,असे आवाहन हॉटेल व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.






