साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Google search engine

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्राम विकास प्रतिष्ठान, घारगाव संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय घारगाव येथे आज दि. २६ जून यावर्षीही सालाबादप्रमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापिका घोडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी केले. कु. अंकिता गाडेकर या विद्यार्थीनीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. के. एच. निंबाळकर सर, प्रा. दळवी सर व प्रा.घोडके सर, प्रा वाल्के सर हे उपस्थित होते. प्रा. दळवी सर यांनी विद्यार्थींना आजच्या दिवसाचे महत्व सांगितले. साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डाॅ. के. एच. निंबाळकर सर यांनी विध्यार्थ्यांना शिक्षण म्हणजेकेवळ ज्ञान मिळवणे नव्हे, तर ते गंभीर आणि सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता विकसित करणे ह्या वाक्याचे महत्व मुलांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी कु. श्रद्धा मांढरे या विद्यार्थीनीने आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी श्री. दत्तकृपा शैक्षणिक संकुल चे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम व संस्थेचे उपअध्यक्ष श्री. साळुंखे सर तसेच संस्थेचे रजिस्टर श्री कल्याण शिंदे व कॅम्पस डायरेक्टर श्री प्रमोद लगड सर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.