शिक्षणशास्त्र महाविद्यालय,घारगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

0
118
Google search engine

 

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, घारगाव येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास दत्तकृपा शैक्षणिक संकुलाच्या सचिव सौ. अर्चनाताई पानसरे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात “शिक्षक समाजाच्या प्रगतीचा पाया असून त्यांचे योगदान अमूल्य आहे” असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.सचिन निंभोरे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “शिक्षक हा समाजाच्या घडणीत महत्त्वाचा घटक असून तोच विद्यार्थ्यांचा खरा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असतो”, असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना अभिवादन करून विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व आदराची भावना जोपासावी, असे सांगितले.या कार्यक्रमाला विभाग प्रमुख प्रा.शिंदे राजश्री तसेच प्राध्यापक शिंदे स्वप्नील, खेंडके प्रवीण,कराळे विजय,शेलार सतीश,कोळेकर तुषार,आहेर गोरक्ष,वाघमारे हनुमंत,गोरे सत्यम,अवघडे वैशाली, भोईटे प्रतीक्षा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल मांढरे व संध्या माने यांनी उत्तमरीत्या केले. विद्यार्थ्यांपैकी अजित पवार, शुभम सोनवणे, राघव शेळके, संजीवनी राहिंज,उषा खेडकर,वैभव लोकरे,अंजली भागवत यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञतेच्या भावना मांडल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी सय्यद युनूस यांनी आभारप्रदर्शन केले. शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.