
मुळेवाडी येथील माऊली दूध संकलन केंद्राचे सर्वेसर्वा माऊली मुळे यांचा आज वाढदिवस साजरा होत असून त्यांना वाढदिवसानिमित्त सनी भैय्या मुळे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांना दुधाला चांगला दर मिळावा, त्यांचे आर्थिक उन्नतीकरण व्हावे या उदात्त हेतूने माऊली मुळे यांनी माऊली दूध संकलन डेअरीची स्थापना मुळेवाडी येथे केली. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माऊली मुळे यांच्या सामाजिक व शेतकरीहिताच्या कार्यामुळे त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भावी कार्यात अधिकाधिक यश लाभावे अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
✨ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा – माऊली मुळे ✨






