फाळके पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जत मध्ये आयटी आणि रोबोटिक्स लॅबची स्थापना  ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आता आपल्या परिसरात 

Google search engine

कर्जत तालुक्यातील सदगुरु ग्रामविकास प्रतिष्ठानचे फाळके पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्जत येथे आयटी आणि रोबोटिक्स लॅब ची PHN Technology, Pune यांच्या साहाय्याने स्थापना करण्यात आली असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची अनमोल संधी उपलब्ध झाली आहे अशी माहिती संस्थेचे सचिव अडसूळ सर यांनी दिली आहे

या आयटी आणि रोबोटिक्स लॅबमध्ये आपण रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT), आर्टीफिसिअल इंटेलिजन्स (AI), ड्रोन टेकनॉलॉजी, ARVR टेकनॉलॉजी इत्यादी तंत्रज्ञान शिकवले जातात .

सद्‌गुरू ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र (तात्या) फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कर्जतमध्ये आयटी आणि रोबोटिक्स लॅब ची सुरुवात करून डिप्लोमा इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळावे या उद्देशाने सुरु केली आहे.

हे महाविद्यालय AICTE, नवी दिल्ली मान्यताप्राप्त, महाराष्ट्र शासन प्रमाणित, तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई संलग्नित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देणे हा या महाविद्यालयाचा प्रमुख उद्देश आहे.

या कॉलेज मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध आहेत. SC / ST /SBC / VJNT या प्रवर्गातील मुलांना व मुलींना १००% ट्युशन फी माफ आहे. OBC / OPEN /SEBC या प्रवर्गातील मुलांना ५०% ट्युशन फी माफ आहे. सर्व प्रवर्गातील मुलींना १००% ट्युशन फी माफ आहे याची नोंद घ्यावी.

 

उपलब्ध कोर्सेस –

१. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग 566799810

२. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग – 566724510

३. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 566729310

४. सिव्हिल इंजिनिअरिंग – 566719110

“कोणतीही प्रवेश परीक्षा न देता आपल्या मुलाला अभियंता बनवण्याची ही उत्तम संधी आहे. सर्व पात्र विद्यार्थी व पालकांनी एकदा महाविद्यालयाला भेट देऊन ही सुवर्णसंधी मिळवावी,” असे आवाहन प्राचार्य, डॉ. भाऊसाहेब अनारसे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावाः 7743811247