
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बर्गेवाडी, या शाळेचा ,”एक पेड, मॉं के नाम”, उपक्रम कौतुकास्पद. या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी, या वर्गातील एकूण 50 विद्यार्थ्यांनी, या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी या शाळेतील शिक्षिका हेमांगी पवार व वैशाली वारंगुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, ,”एक पेड, माॅं के नाम” हा उपक्रम राबविलेला आहे .
या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाचे वृक्षारोपण आईसमवेत करणे अनिवार्य आहे .,”एक विद्यार्थी, एक झाड “ही संकल्पना अमलात आणली आहे.
यावेळी विद्यार्थी प्रभुजीत सुधीर शिंदे व त्याची आई सिंधुताई सुधीर शिंदे यांनी “एक झाड आईसाठी, एक वृक्ष देशासाठी” या संकल्पने अंतर्गत, एका आंब्याच्या रोपाचे रोपण केले.
फोटो
“एक झाड, आईसाठी “या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करताना विद्यार्थी- प्रभुजीत व त्याची आई-सौ.सिंधुताई सुधीर शिंदे.






