लकी हॉटेलची यशस्वी वाटचाल , 6 वर्षांचा टप्पा पूर्ण, 7 व्या वर्षात दिमाखात पदार्पण!

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील हॉटेल व्यवसायात अत्युच्च गुणवत्ता, ग्राहकसेवा आणि सतत नाविन्याच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या लकी उद्योग समूहाचे सहा वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली असून आता हा समूह सातव्या वर्षात भव्य पदार्पण करत आहे.

या यशस्वी प्रवासामध्ये दिगंबर शिवदास गदादे यांचा मूलभूत मार्गदर्शनाचा पाया, तसेच त्यांचे सुपुत्र डॉ. विठ्ठल गदादे आणि संदीप गदादे यांची आधुनिक व्यवस्थापन कौशल्ये व कष्टाचे योगदान अतुलनीय ठरले आहे.

 

2019 पासूनचा प्रवास – एक हॉटेल ते एक ब्रँडपर्यंत

7 जुलै 2019 रोजी लकी हॉटेलच्या रूपाने सुरू झालेला हा प्रवास आज रेस्टॉरंट, लॉजिंग, आणि लॉन्स पर्यंत विस्तारला असून कर्जत व परिसरात एक विश्वासार्ह आणि गुणवत्ताधारित ब्रँड म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य – सेवा हेच आमचं ब्रीद

लकी समूहाची सर्व सेवा “स्वच्छता, स्वाद, शिस्त आणि सौंदर्य” या चार स्तंभांवर उभी आहे. कुटुंबवत्सल वातावरण, दर्जेदार जेवण, आणि ग्राहकसेवेतील नवनवीन प्रयोग यामुळे लकी हॉटेल हे आज अनेकांच्या आठवणींमध्ये स्थान मिळवत आहे.

 

लोकांच्या प्रेमावर उभारलेला व्यवसाय

आज लकी उद्योग समूहावर हजारो ग्राहकांचा विश्वास आहे. स्थानिक रोजगार निर्मिती, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि “ग्राहक देवो भव” ही भूमिका यांनीच लकी समूहाचे खरे यश सिद्ध केले आहे.

 

वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक आभार

गदादे कुटुंबीयांनी या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, हितचिंतक, आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले आहेत. “या यशामागे आमचा नव्हे, तर तुमचा विश्वास आणि पाठिंबा आहे. पुढेही तोच विश्वास जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन डॉ. विठ्ठल गदादे व संदीप गदादे यांनी व्यक्त केले.

संपर्कासाठी:

लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन

कर्जत, जिल्हा अहमदनगर

📞 +91 96975 11511 / 73856 14444