पुराणे परिवाराचा पर्यावरण पूरक स्तुत्य उपक्रम
कै.रामचंद्र लक्ष्मण पुराणे (माजी सैनिक) यांच्या स्मरणार्थ तेराव्या च्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या पाहुण्यांना आंबा व वड वृक्ष भेट

कै.रामचंद्र लक्ष्मण पुराणे( माजी सैनिक ) यांच्या स्मरणार्थ आज तेराव्याच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या पाहुण्यांना आंबा व वड वृक्ष भेट देण्यात आले .
वृक्षांची सावली व फळांनी आबा कायम स्मरणात राहतील या उदात्त हेतूने श्री.प्रा.सचिन पुराणे सर व चि.संदीप पुराणे या बंधूंनी हा स्तुत्य उपक्रम राबवला.यावेळी सर्व पाहुण्यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या कार्यास सलाम केला.
वृक्षारोपण ही फक्त एक पर्यावरणाची गरज नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित होईल ही भावना लक्षात घेऊन त्यांनी हा उपक्रम राबवला.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, कारण त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवता येतो आणि पर्यावरणाचा समतोल राखता येतो. वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होत आहे. तापमान वाढत आहे आणि अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यावर उपाय म्हणजे वृक्षारोपण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे. वृक्षारोपण हे महत्त्वाचे असून यामुळे पर्यावरणाचा समतोल राखता येतो.झाडे हवा शुद्ध करतात, तापमान कमी करतात आणि मातीची धूप थांबवतात.झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवामान चांगले राहते. झाडे विविध प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी निवास प्रदान करतात, ज्यामुळे जैवविविधता वाढते. आर्थिक आणि सामाजिक फायदे यामध्ये वृक्ष, फळे, फुले, लाकूड आणि इतर संसाधने देतात, ज्यामुळे लोकांना रोजगार मिळतो आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारते.हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल पुराणे बंधूंचे कौतुक होत आहे.






