
आनंदवाडी येथील सामान्य कुटुंबातून आलेले आणि असामान्य ध्येय दृष्टिकोन व सामाजिक बांधिलकीने झपाटलेले शुभम खोसे पाटील यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्जत तालुक्यात कौतुक केले जात आहे.
शुभम खोसे पाटील हे शालेय जीवनापासूनच अत्यंत अभ्यासू व हुशार होते त्यांनी शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करत बारावीनंतर समाजातील गरीब, वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधीक्षत्राचा मार्ग निवडला त्यांनी कायद्याच्या अभ्यासातही सामाजिक भान आणि कर्तव्यनिष्ठा जपली शुभम यांनी पुण्याच्या नामांकित सिंहगड विधी महाविद्यालय पुणे येथून एलएलबी पदवी प्राप्त केली.
शिक्षण काळात त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सारख्या विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभागी व नगर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत असताना जिल्ह्यातील आणि राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, ऍडमिशन, शिष्यवृत्ती यांसारखे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले.ही बाब त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरते शुभम पाटील केवळ कायद्याचा विद्यार्थी नव्हे ते न्यायासाठी लढणारे कार्यकर्ते होते. त्यांनी वेळोवेळी सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्वक आणि निर्भीडपणे आवाज उठवला त्यांच्या तत्त्वनिष्ठ सामाजिक बांधिलकी आणि संघर्ष प्रवृत्तीमुळे आज ते एक संवेदनशील प्रगल्भ आणि कटाक्षाने नेण्याचा विचार करणारे वकील म्हणून उदयास येत आहेत.
आज औरंगाबाद उच्च न्यायालयात त्यांची वकिली सुरू झाली असून हे यश केवळ वैयक्तिक नाही तर कर्जत तालुक्यातील तमाम तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. अनेक नवतरुण आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत कायद्याच्या क्षेत्रात जाण्याचा निर्धार केला आहे. समाजासाठी न्यायाचे शास्त्र ठरलेले शुभम खोसे पाटील एका खेळातून उठलेले वादळ असून हे नाव आता केवळ एका वकिलेचे नाही तर समाजासाठी लढणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या आणि कायद्याच्या माध्यमातून परिवर्तन घडवणाऱ्या तेजस्वी नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे.
सर्वोच्च न्यायालयात यशस्वी इंटर्नशिप , शुभम खोसे यांचा गल्ली ते दिल्लीपर्यंत डंका
शुभम खोसे पाटील यांनी आनंदवाडी सारख्या एका खेडेगावातून थेट दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात यशस्वीरित्या तीन महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केली आहे. या सर्व सामान्य कुटुंबातील मुलाचा गल्ली ते दिल्ली डंका चालू आहे.






