मंथन परीक्षेत सृष्टी ढेरे चे घवघवीत यश

Google search engine

मंथन परीक्षेत सृष्टी ढेरे चे घवघवीत यश

 

मा.सभापती बापूसाहेब शेळके व अजित शेळके यांच्या वतीने सन्मान

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव ची विद्यार्थिनी सृष्टी रामदास ढेरे इयत्ता दुसरी या चिमुकलीने मंथन परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत दहावा व विभागीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक आल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या आदरणीय कल्याणी निलेश टेंभरे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. तसेच पंचायत समिती करमाळा माजी सदस्य श्री जालिंदर बापू पानसरे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला त्यांनी तिला ५०१ रुपये बक्षीस दिले. तसेच गावातील नागरिक प्रमोद फरतडे यांनी तिला ५०१ रुपयाचे बक्षीस दिले. सृष्टी ढेरे व मार्गदर्शक शिक्षक यांचे कुंभारगाव ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती व पालक यांच्याकडून सन्मान करण्यात आला. तसेच बापूसाहेब शेळके मा.सभापती , अजित शेळके यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.