
महाराष्ट्र शासन जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत थेरगाव ता. कर्जत येथे काल आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते बंधारा कामाचे भूमिपूजन करण्यात आले. थेरगाव साठी आ .रोहित दादांनी भरीव निधी दिला त्या बद्दल आ .रोहित दादा पवार यांचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. अशाप्रकारे दोन बंधारे थेरगाव येथे मंजूर करून रोहित दादांनी थेरगाव वरती खूप मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. दोन बंधाऱ्याची रक्कम रक्कम अंदाजे दीड कोटी रुपये आहे. एक बंधारा 68 लाख रुपये आणि दुसरा बंधारा 80 लाख रुपयांचा आहे. आमदार रोहित दादा पवार यांचे थेरगावच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित थेरगावचे माजी सरपंच शोभाचंद शिंदे (आबा) मा. संभाजी बेद्रे उद्योजक पै. बंटीशेठ धुमाळ ( कट्टर समर्थक रोहित दादा पवार) कोंभळी गावचे सरपंच दीपक गांगर्डे , खांडवी गावचे माजी सरपंच किशोर तापकीर , मा. काकासाहेब गोरखे उद्योजक मा. अंकुश जेधे , गोरख आण्णा शिंदे, संदिप शिंदे उद्योजक , पै राजेंद्र शिंदे , पै सर्जराव शिंदे , दादा बन्सी शिंदे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
यापुढे थेरगांवला विकासकामाला निधी कमी पडुन देणार नाही असा शब्द आमदार रोहित दादा नी दिला व माझ्या सोबत असलेल्या जीवांच्या कार्यकर्त्यांना मी येत्या काळात बळ देणार असा विश्वास दिला व मा. संभाजी बेद्रे व शोभाचंद शिंदे आबा यांनी आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.






