
कर्जत तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिवसेना व युवासेना व अर्पण ब्लड बँक अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहरात हे शिबीर होणार आहे. या शिबिरामुळे अनेक रुग्णांचे प्राण तर वाचणार आहेतच परंतु रक्तदात्यांना अनेक फायदे होणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख बळीराम (आणा )यादव यांनी सांगितले ते म्हणाले की ,रक्तदान हे जीवदान आहे , रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्ताची जाडी कमी होते आणि रक्ताभिसरण वाढते, रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो, शरीर अनेक आजारांपासून वाचते. त्यामुळे सर्व शिवसैनिक रक्तदान करणार आहेतच परंतु नागरिकांनाही रक्तदान करण्याचे आव्हाहन तालुका प्रमुख बळीराम यादव यांनी केले आहे. रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
शिबिराचे ठिकाण:- जि. प. प्राथमिक शाळा कर्जत वेळ- सकाळी 9:00 ते सायं. 5:00 वाजेपर्यंत






