अळसुंदे हायस्कूलचे शासकीय रेखाकला परीक्षेत सुयश संपादन

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, अळसुंदे या ग्रामीण भागातील बाल संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. विद्यालय व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीपूर्ण माध्यमातून कला क्षेत्रातील योगदानाचा परिपाक म्हणून या शैक्षणिक वर्षातील शासकीय रेखा कला परीक्षेत एलिमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केलेले आहे आणि विद्यालयाचा कलाक्षेत्रात १००टक्के निकाल लागलेला आहे.

सदर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या अक्षरलेखन, स्थिरचित्र, मुक्तहस्त चित्र, कृती भूमिती इत्यादी विषयांची नियोजनानुसार जादा तासिका घेऊन परिपूर्ण तयारी करून घेण्याचे कार्य विभाग प्रमुख मोहन बनसुडे यांनी केले त्याचबरोबर बाह्य तज्ञ मार्गदर्शक व ऑनलाईन माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य विद्यालयातील सर्व तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने केले.

सुयोग्य रेखाचित्रासाठी योग्य पेन्सिलचा उपयोग, सुयोग्य रंगकाम याचे परिपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देऊन यशश्री संपादन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे कला विभाग प्रमुख मोहन बनसोडे यांचे स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक व माता पालक संघ, सरपंच ,उपसरपंच व सदस्य आळसुंदे ग्रामपंचायत यांच्यावतीने यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून सेवानिवृत्त होणाऱ्या खेळाडूंनी अखेरच्या सामन्यामध्ये शतक झळकावे तसे मोहन बनसुडे यांनी विद्यालयाच्या शिरपेचात कलाक्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे असे गौरवोद्गार मुख्याध्यापक रामदास परहर यांनी काढले.

विद्यालयातील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात संपादन केलेल्या सुयशाबद्दल आणि विद्यालय व्यवस्थापनाने केलेल्या प्रयत्न बद्दल मुख्याध्यापक रामदास परहर, मोहन बनसुडे, सुनील गोरखे, प्रवीण कांबळे, रवींद्र विधाते आणि नितीन जगताप यांचे अळसुंदे व देमनवाडी परिसरातील सर्व पालक आणि कलाप्रेमी नागरिकांनी विशेष कौतुक केले.