कर्जत तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे आयोजन 

Google search engine

 

 

कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांकरिता कर्जत येथील सदगुरु ग्राम विकास प्रतिष्ठान च्या वतीने राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे आयोजन दि ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कर्जत शहरात फाळके पेट्रोल पंपाशेजारील मैदानात आयोजन केले आहे ,

तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांसह नव उद्योजक, व्यावसायिक , महिला यांना या कृषीप्रदर्शनाचा फायदा होणार आहे

या कृषीप्रदर्शना मध्ये नवनवीन तंत्रज्ञान,अवजारे, ट्रॅक्टर्स, ठिबकसिंचन, सोलर, खते , बि-बीयाणे, पशुआहार, सह शेती विषयक सर्व काही एकाच ठिकाणी पाहता येणार असुन , महिला करिता घरगुती लघु उद्योगाची माहीतीही उपलब्ध होणार आहे ,

या कृषीप्रदर्शना चे खास आकर्षण एक कोटी किमंतीची भारतातील प्रसिध्द अनेक पुरस्कार प्राप्त कर्नाटक येथील रेडा जोडी असणार आहे . तसेच महिलांसाठी गृहपयोगी वस्तुंचे अनेक स्टाॅल या ठिकाणी असणार आहे लहानमुलां करिता किड्स झोन ही असणार आहे

असे हे सर्व समावेशक कृषीप्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधव ,महिला वर्ग,नव उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन सदगुरु ग्राम विकास प्रतिष्ठान कर्जत च्या वतीने करण्यात येत आहे