
कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्रातील महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान करा असा संदेश दिला.
विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, यासाठी सर्वत्र जोरदार मतदार जनजागृती करण्यात येत आहे. प्राचार्य चौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती करण्यात आली .
सर्वत्र मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यातीलच मानवी साखळीतून मतदान जनजागृती हा एक उपक्रम आहे. या साखळीत विद्यालयाचे प्राचार्य , सर्व शिक्षक, विद्यार्थी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. मतदान जागृतीच्या अनुषंगाने केलेल्या मानवी साखळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.






