रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या पक्षाकडून भोसे येथील करण भाऊ चव्हाण यांना कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर

Google search engine

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A ( दिपक भाऊ निकाळजे गट) या पक्षा कडून भोसे तालुका कर्जत येथील करण भाऊ चव्हाण यांना कर्जत / जामखेड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली.त्यांनी एबी फॉर्म देण्यात आला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रीय सचिव मोहनलाल पाटील , जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड ,तालुका अध्यक्ष भगवान गजरमल , नितीन चव्हाण, प्रवीण चव्हाण,युवराज शिंदे,सचिन घोडके,दत्ता शिंदे,अजित चव्हाण,महेश थोरात,भीमराव चव्हाण यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना करन चव्हाण म्हणाले की , कर्जत जामखेड मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A गट (दीपक भाऊ निकाळजे गट ) यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे .येणाऱ्या काळात कर्जत जामखेड परिवर्तन अटळ असून सर्व कार्यकर्त्यांच्या खंबीर साथीने मी ही निवडणूक लढवणार असून कर्जत जामखेड मतदार संघात विद्यमान आमदारांच्या विकासकामांच्या अपयशामुळे परिवर्तन अटळ आहे .