येणाऱ्या काळामध्ये नवतरूण युवा नेता रोहीत दादा पवार यांना पुन्हा एकदा आपल्या कर्जत जामखेडची सेवा करण्याची संधी मिळावी : रामभाऊ जंजिरे

Google search engine

 

२०१८ साली कर्जत जामखेड मतदार संघांची पाच वर्षापूर्वी ओळख ही एक भाजपचा मतदार संघ म्हणुन होता. एकहुकमी सत्ता येऊन भाजप ने कुकडी पाण्याचा मुद्दा समोर ठेवत कर्जत जामखेड मध्ये नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. सक्षम विरोधक नसल्याने अनेक विकास कामांना फारसी चमक नव्हती . मुख्य प्रतिनिधी करणारे हवेत तर कार्यकर्ते त्यांच्या उशाला बसुन विकास कामांचा मलिंदा खाण्याचे काम करत होते . वशील्यांचे ठेकेदार हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे कामे मतदार संघात करण्याचा प्रयत्न केला गेला . २०१८ नंतर कर्जत जामखेड च्या जनतेचा व सर्वसामान्य कार्यकर्ताच्या भावनेचा विचार करून एक रोहीत पर्वाचा नव्या दमदार विचारांचा तसेच युवा तरुण श्री रोहीत राजेंद्र पवारांचा उदय झाला सामाजीक भावना जतन करून बौद्धिक व राजकीय दृष्ट्या सक्षम राहून सर्व सामान्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करून कर्जत जामखेड मतदार संघात राजकीय सत्ता प्रस्थापित करून सर्वसामान्यांच्या मनामध्ये आपला ठसा उमटवला आज ही त्यांची कार्यशैली चे दर्शन होते . कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य जनतेशी प्रामाणिक राहून सर्वांसारखा आपल्या कामाच्या स्वरूपात न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे . जिथे जाऊ तिथे खाऊ अशी भुमिका असणाऱ्या कार्यकर्त्याना डावलून आज एकनिष्ट व प्रामाणिक असणाऱ्या कार्याकार्याना हाताशी धरून सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करीत आहे . शासन स्तरावरील योजना येतच असतात याच राजकारण न करता त्यांनी कोणताही भेदभाव न करता आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावोगावी उन्हाळी पाणी पुरवठा तसेच पानंद रस्ते , शालेय उपयोगी विद्युत उपकरणे व साहीत्य सायकली अशा विविध स्वरूपात शालेय मुलांपर्यंत व जनते पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला . गेल्या पाच वर्षापूर्वी च्या तुलनेत सामाजिक विकास कामांच्या स्वरूपात बदलेल चित्र पाहतोय .हे सर्वानी मान्य केल पाहीजे तरीपण कोरोना काळ तसेच नंतर सत्ता बदल नाटकीय खेळी मुळे विकास कामांचा गती वर परिणाम होऊ न दिला नाही . शेवटी श्रेय वादाची लढाई चालु असते पण रोहीत दादाचे पाऊल पडल्यांने बदल होत आहे. जनतेने मान्य केले पाहिजे . एम.आय.डी.सी. जर कर्जत – जामखेड मतदार संघांच्या सीमेवर झाली असती तर आणखी फायदा दोन्ही मतदार संघातील युवा पिढीला झाला असता . आज विकास काम करित असतांना त्यांचा परिवार सुद्धा त्यामध्ये त्यांच्या मातोश्री सुनंदाताई असो किंवा वडील राजेंद्र पवार यांचा सुद्धा सहभाग राहून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे . त्यांच्या मातोश्री सुनंदाताईनी आपल्या कर्जत जामखेड मतदार संघात विविध महिलांचे बचत गटाचां आधार घेऊन आपल्या मतदार संघातील महिला सक्षम कशी होईल यासाठी व्यावसायिक अर्थिक दृष्टया मार्गदर्शन केले . पवार घराणे नेहमी सामाजिक बांधिलकी जपुन मतदार संघात सामाजिक विघटन न होता एकी कशी टिकुन राहील याचा प्रमाणिक प्रयत्न केला . जगायला प्रत्येकाला येते पण दुसऱ्या साठी जगण काय असत हे फक्त रोहीत दादा पवार यांच्या परिवराकडून शिकावे .असे युवा तरूण व्यक्तीमत्व कर्जत जामखेडला लाभण एक भाग्य म्हणायच.आज युवा तरूण चेहऱ्याला अजुन संधी मिळाली तर एक सामाजिक परिवर्तन नक्की घडून येईल. समाजाला अनुसरून समाजाचे हित लक्षात धरून राजकारण केले तर हे सर्व सामान्यं जनेतच्या नेहमी हिताचं राहील. सरळ नव तरूण युवा आमदार जनतेच्या संपर्कात आल्यांने काही व्यक्तींना पोटशुळ आली .विरोध करणे किंवा टिका टिपण्णी करणे तसेच सर्वसामान्य स्वातंत्र्यावर बंधन लादणे असे राजकारण समाजाला पटत नाही त्यामुळे जाऊ तिथे खाऊ किंवा सरड्या सारखे रंग बदलुन राजकारण करणाऱ्या विचारांना साथ न देता येणाऱ्या काळामध्ये नवतरूण युवा नेता रोहीत दादानां आपल्या कर्जतजामखेडची सेवा करण्याची संधी मिळावी हीच सदिच्छा

रामभाऊ जंजीरे ,  प्रामाणिक आणि निस्वार्थी कार्यकर्ता , राष्ट्रवादी काँग्रेस , शरदचंद्र पवार गट