
सोशल मीडियाचा उपयोग करून आ. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या विजयात मोलाचे योगदान देणार असल्याची माहिती सोशल मीडिया प्रमुख अविनाश बेद्रे यांनी दिली.
ते यावेळी बोलताना म्हणाले , भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेब यांच्यासाठी सोशल मीडिया च्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्यासाठी मदत होणार असून आ. प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा निर्धार त्यांनी यावेळी केला .
यावेळी बोलताना अविनाश बेद्रे म्हणाले की ,
आमदार प्रा राम शिंदे यांनी सेवेकरी म्हणून मतदारसंघात काम केले. त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सर्वसामान्य नाही, मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.परंतू यंदा विरोधकाला मोठ्या मतांनी हरवा की यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला कर्जत जामखेड मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले. आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ, शांत,संयमी, असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे.
भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा जलसंधारण व इतर कामांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. प्रा .राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी येणारे ३० दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.






