समर्थ विद्यालयाच्या कट्ट्यावर आमदार रोहित पवार यांची मुलाखत

0
923
Google search engine

 

समाज प्रबोधन संस्थेच्या समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत व चंद्रभामा महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८/९/२०२४ रोजी कर्जत जामखेडचे लोकप्रिय व विद्यार्थ्यांचे आवडते आमदार श्री. रोहित (दादा) पवार साहेब यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली. आमदार श्री. रोहित (दादा) पवार यांची मुलाखत प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते श्री. संजय कळमकर यांनी घेतली. यावेळी आमदार श्री. रोहित ( दादा )पवार व मुलाखतकार श्री. संजय कळमकर यांचे समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल व लेझीमच्या गजरात स्वागत केले.

समर्थ विद्यालयाच्या ‘असा मी घडलो’ या उपक्रमांतर्गत आमदार रोहित (दादा) पवार यांचा जीवनपट व त्यांचे शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, शेती व सामाजिक कार्य याविषयीचे विचार जाणून घेण्यात आले. पल्लवी भोईटे, निकिता दरेकर, नम्रता नेवसे,दिया मिसाळ,साक्षी वाघमारे,अमृता भोसले, प्रतीक्षा नांगरे, अबूबकर अन्सार शेख या विद्यार्थ्यांनी आमदार श्री. रोहित दादांना त्यांचे बालपण, शालेय जीवनातील प्रसंग, शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांच्या शिक्षण विषयीच्या भविष्यातील योजना याविषयी विविध प्रश्न विचारून त्यांचे विचार जाणून घेतले. श्रीमती शितल टांकसाळे, श्रीमती पल्लवी खराडे, नगराध्यक्षा सौ. उषा राऊत, प्राचार्य चंद्रकांत राऊत तसेच डॉक्टर राम तोरडमल, ॲड.धनंजय राणे, डॉक्टर चंद्रशेखर मुळे यांनीही आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारले. मुलाखतकार साहित्यिक संजय कळमकर यांनी रोहित दादांच्या बालपणाविषयी तसेच राजकीय आदर्श, भविष्यातील विविध क्षेत्रातील योजना याविषयी आमदार साहेबांचे विचार विद्यार्थी व मान्यवरांच्या समोर व्यक्त करण्यास बोलते केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेव (देवा) राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समर्थ विद्यालय, चंद्रभामा महाविद्यालय, भारती पब्लिक स्कूल, ग्लोबल इंग्लिश मीडियम या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक तसेच डॉक्टर असोसिएशन, बार असोसिएशन कर्जत, रोटरी क्लबचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मुलाखतीच्या निमित्ताने आमदार श्री. रोहित (दादा) पवार यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व , भविष्यातील विविध क्षेत्रांविषयी त्यांच्या योजना, त्यांचे बालपण, आदर्श, कला,क्रीडा व साहित्य क्षेत्र व पुढील काळातील विकासाचा दृष्टिकोन याविषयीचे विचार उपस्थितांना ऐकण्यास मिळाले.

अतिशय हसत खेळत व आनंदी वातावरणात मुलाखतकार श्री. संजय कळमकर यांनी ही मुलाखत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल भापकर व दीपक लांगोरे यांनी केले.