
दिनांक १८/०९/२०२४ रोजी श्रीजित जनार्धन पोटरे धंदा कुरीअर ऑफिस रा चापडगाव ता. कर्जत यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, दिनांक १६/०९/२०२४ रोजी चे रात्री ०९:०० वा ते १७/०९/२०२४ रोजीचे दुपारी ०४:०० वा सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे मेट्रो कॉम्पलेक्स कुळधरणरोड, कर्जत येथे डिलिव्हरी लिमीटेड कुरीअर ऑफिसचे शटरचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन लॉकरचे लॉक तोडुन त्यामध्ये ठेवलेली २४२३४/- रोख रक्कम व ५०००/-किंमतीचा इक्वीजन कंपनीचा सी सी टी व्ही चा डीव्हीआर चोरुन नेले आहे असे फिर्यादीचे फिर्यादवरुन कर्जत पोलीस ठाणे येथे अपराध क्रमाक ५८१/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५ (अ) प्रमाणे दिनांक १८/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झालेनंतर पोलीस निरीक्षक श्री मारुती मुळुक कर्जत पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना तातडीने तपास करण्याच्या सुचना केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी श्री प्रदीप बोऱ्हाडे पोउपनि यांनी आपले पथकासह घटनास्थळी भेट देवुन तेथील व परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासुन त्यातील संशयित इसमाचा जिल्हयातील व परजिल्हयातील गोपनीय यंत्रणेमार्फत आरोपी निष्पन्न करुन आरोपी बबन सर्जेराव जाधव वय ५२ वर्षे रा. चौधरवाडी ता फलटण जि सातारा सध्या रा. ढासेवाडी ता बारामती यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन आरोपीस दिनांक 20/09/2024 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन गुन्हयातील चोरी केलेली रोख रुपये 10,000/- हस्त्तगत करण्यात आलेली आहे.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे दिसुन आले असून त्याने सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बीड, कोल्हापूर, इत्यादी जिल्हयांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शना महिला पोलीस हवालदार/मिनाक्षी कांबळे व पोकों/शाहुराज तिकटे हे करीत आहे.
आरोपी नामे बबन सर्जेराव जाधव वय 52 वर्षे रा. चौधरवाडी ता फलटण जि सातारा सध्या रा. ढासेवाडी ता बारामती जि पुणे याचेवर पूर्वी दाखल असलेले गुन्हे खालीलप्रमाणे
01) कर्जत पो.स्टे.गु.रजि.नं. 581/2024 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 305 (अ) प्रमाणे
02) पारनेर पोलीस स्टेशन गु.रजि. नं.431/2024 भा.द.वि.क. 457,380 प्रमाणे 02
03) चाकण पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 791/20219 भा.द.वि.क. 380 प्रमाणे
04) शाहुपुरी पोलीस स्टेशन गु. रजि. नं.353/2019 भा.द.वि.क. 454,457,380 प्रमाणे 05) इंदापुर, पुणे पोलीस स्टेशन गु. रजि.नं. 48/2004 भा.द.वि.क. 457,380 प्रमाणे 06) फलटण तालुका पोलीस स्टेशन गु.रजि. नं.395/2005 भा.द.वि.क.379 प्रमाणे
07) फलटण तालुका पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 372/2005भा.द.वि.क. 379,411 प्रमाणे
08) फलटण तालुक पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 08/2011 भा.द.वि.क.427 प्रमाणे
09) फलटण तालुका पोलीस स्टेशन गु.रजि. नं.396/2005 भा.द.वि.क. 379,411 प्रमाणे
10) पुणे शहर पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 133/2002 भा.द.वि.क.379 प्रमाणे
11) सासवड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 45/2002 भा.द.वि.क.379 प्रमाणे
12) बारामती पोलीस स्टेशन गु.रजि. नं.20/2004 भा.द.वि.क.457,380 प्रमाणे
13) भोर, पुणे पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 58/2009 भा.द.वि.क. 326 प्रमाणे
14) पुणे शहर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 52/2004 भा.द.वि.क.379 प्रमाणे
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री विवेकानंद वाखारे साहेब, पोलीस निरीक्षक श्री मारुती मुळूक, यांचे सुचना मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बो-हाडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ पांडुरंग भांडवलकर, महिला पोहवा/मिनाक्षी कांबळे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ प्रताप देवकाते, पोकॉ प्रकाश दंदाडे, पोकॉ नितिन धस, पोकॉ/ शाहुराज तिकटे मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू व पोकों नितिन शिंदे यांनी केली आहे.






