भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या पक्षाच्या उठाठेवी बंद करून स्वतःच्या पक्षातील गटतट पाहावेत:- गणेश सूद्रीक , कार्याध्यक्ष ,

Google search engine

भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांना भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढीसाठी किंवा पक्ष संघटन करण्यासाठी पदे दिली आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उठाठेव करण्यासाठी पदे दिले आहेत काय हा मेळच लागत नाही.

भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षांना सांगू इच्छितो की,अगोदर आपल्या पक्षामध्ये किती गटातटाचे राजकारण चालू आहे याचा अभ्यास करा म्हणजे आपल्याच घरामध्ये किती गदारोळ चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल.तुम्ही जर फारच सक्षम आणि गतिशील जर असतात तर तुमच्या नेत्यांच्या माध्यमातून किंवा तुमच्या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची काहीतरी कामे करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तालुकाध्यक्ष झाल्यापासून आत्तापर्यंत आरोग्य,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक, महिला सक्षमीकरण किंवा इतर विषयांमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी आत्तापर्यंत कोणकोणती कामे केली याची प्रत्येकी फक्त पाच पाच कामांची यादी तुम्ही सोशल मीडियावरती टाका. त्यामुळे आपला पक्ष लोकांसाठी काय करू शकतो आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी जर काही केले तर त्यांच्या पेक्षा जास्त कामकाज आपण काय करू शकतो याचा विचार करा. माननीय आमदार रोहिदादा पवार हे आमच्यासाठी सक्षम आहेत आम्हा कार्यकर्त्यांना त्यांच्यामुळे जो मान सन्मान,जी ताकद आणि आम्ही त्यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी जी कामे करू शकतो हीच ताकद आमच्यासाठी खूप मोठी ताकद आहे.त्यामुळे तुम्ही विनाकारण बालिश बुद्धीसारखे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असे झाले,अशी वागणूक भेटली, कार्यकर्त्यांचे असे हाल आहेत एवढी मोठी यंत्रणा आहे अहो ज्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी करायचे आहे त्यांना एवढी मोठी यंत्रणा ठेवावीच लागते.राम शिंदे साहेबांकडे सर्वसामान्य जनतेची काम करण्याची इच्छा शक्तीच नाही त्यामुळे त्यांना यंत्रणेची गरजच पडणार नाही.आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ह्या सवयीची जी लोक आहेत त्यामुळे सुद्धा निष्क्रियता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे.त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षाची उठाठेव करण्यापेक्षा तुमच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी कर्जत जामखेड मतदार संघासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा.

आम्हाला माहित आहे तुम्ही ) १५००० सायकली कधीच वाटू शकत नाही त्याच्यासाठी दातृत्व आणि कर्तुत्व आणि नेतृत्व अंगामध्ये असावं लागतं तुम्ही निदान ५०० तरी विद्यार्थ्यांना सायकली वाटण्याचा प्रयत्न करा.

२) तुम्ही निदान १०० लोकांना तरी आरोग्य विभागामार्फत मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करा.

३) तुम्ही निदान ५० महिलांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करा.

४) तुम्ही निदान वीस विद्यार्थ्यांना तरी बाहेरच्या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा.

५) तुम्ही निदान १० गरीब व गरजूवंत मुलांचे पालकत्व घेण्याचा प्रयत्न करा.

६) तुम्ही निदान दोन गावांमध्ये तरी धार्मिक क्षेत्रामधील वस्तू वाटण्याचा प्रयत्न करा.

७) तुम्ही निदान एका गावांमधील तरी जेष्ठ व्यक्तींना नेत्र तपासणीचा किंवा फिरता दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करा.

८) कोरोना सारख्या महामारी मध्ये तुम्ही कुठे होता.

९) जेव्हा आमची सर्वसामान्य जनता पाण्यावाचुन तळमळत होती,जेव्हा जनतेला आधाराची गरज होती त्यावेळेस तुम्ही निदान एखाद्या गावामध्ये तरी स्वतःच्या स्वखर्चातून पाण्याचा टँकर देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता.

आपण स्वतः निष्क्रिय आहोत परंतु,माननीय आमदार रोहित दादा पवार हे सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊन मदतीला धावून येतात आपण निदान एखाद्या व्यक्तीसाठी तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा.तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये तालुका अध्यक्षांचा एक गट,युवकांचे दोन गट,जुन्या व्यक्तींचा एक गट, निष्ठावंतांचा एक गट,कामे करणाऱ्यांचा एक गट,कामे मिळाले नाहीत म्हणून नाराजांचा एक गट ही जी तफावत तयार झाली आहे अगोदर ती जुळवण्याचा प्रयत्न करा. विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची उठाठेव आणि रोहित दादा पवार यांची विकासाच्या माध्यमातून बरोबरी करण्याचा केविलवाना प्रयत्न करू नका. तुम्हाला असे वाटत असेल की, कार्यकर्त्यांची ससे होलपट चालू आहे परंतु आमचा नेता आमच्यासाठी आधार आहे आणि आमच्या नेत्यांमुळे आम्ही सर्वसामान्य जनतेची कोणत्याही प्रकारची कामे मार्गी लावत आहोत आणि आमच्या नेत्याचं रोहित दादा पवार यांचे महाराष्ट्र राज्यामध्ये काय वजन आहे हे आम्हाला सर्वसामान्य जनतेच्या कामकाजावरून लक्षात येत आहे.उगीच रोहित दादा यांची उठाठेव करण्यापेक्षा किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये डोकावुन पाहण्यापेक्षा तुमच्या ताटामध्ये काय वाढले आहे आणि सर्वांना खाता येत आहे का याची काळजी घ्या. म्हणजे हे असे झाले आपलं घर उपाशी आणि लोकांचे घर तुपाशी ही सवय सोडून द्या रोहित दादा पवार यांनी जर १०० कामे केली तर तुम्ही निदान १० तरी कामे करण्याचा प्रयत्न करा. विनाकारण अकलेचे तारे तोडून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. स्वतःच्या कर्तुत्वावरती आणि स्वतःच्या कामकाजाने आपोआप सर्वसामान्य जनता प्रत्येकाला किंमत आणि महत्त्व देत असते. त्यामुळे विनाकारण चमकोगिरी करून कोणीही चमकत नसतं स्वतःच्या कर्तुत्वातून ते दाखवायचं असतं.आमची पार्टी, आमचे नेते,आमचे पदाधिकारी, आणि आमचे कार्यकर्ते यांचा तुम्ही केविलवाना विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा विचार करा त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न करा आणि तुमचेच कार्यकर्ते तुमच्या कार्यपद्धतीवरती किती नाराज आहेत हे आम्हाला बोलून दाखवायची इच्छा नाही.रोहित दादा पवार यांचे कार्यकर्ते कधीही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरती खालच्या पातळीवरती जाऊन अद्यापही बोललेले नाहीत आणि ती आमची संस्कृती सुद्धा नाही. तुमच्या भारतीय जनता पार्टी मधील कार्यकर्ते येणाऱ्या कार्यकाळात रोहित दादा पवार यांची साथ किती जण देत राहणार याचे उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कळेल.

गणेश सुद्रीक  , कार्याध्यक्ष

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष कर्जत.