सामाजिक न्याय विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी सागर गंगावणे यांची निवड

Google search engine

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या कर्जत तालुका कार्याध्यक्ष पदी गुरवपिंप्री येथील सागर गंगावणे यांची नुकतीच निवड करण्यात आली .अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते आमदार रोहित दादा पवार ,तालुकाध्यक्ष नानासाहेब साबळे ,युवकचे अध्यक्ष नितीन धांडे आदींच्या उपस्थितीत सागर गंगावणे यांची निवड करण्यात आली.आगामी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूभुमीवर कर्जत जामखेड मतदार संघाचे आ.रोहित पवार यांनी चांगलीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.त्या अनुषंगाने कर्जत येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे स्वाभिमानी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी खा.लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.त्यामध्ये सागर गंगावणे यांना निवडीचे पात्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार , महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आ.रोहित पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी पोहोचवण्याचे काम करावे तसेच पक्षवाढीसाठी व पक्ष मजबूतीसाठी भरीव कामगिरी करावी असे या पत्रात म्हटले आहे.विविध कामांच्या माध्यमातून व वेगवेगळ्या योजना व प्रभावी उपक्रम राबवताना युवकांची संघटीत पने मोट बांधण्यात आ.रोहित पवार सरस ठरले आहेत .मतदार संघातील युवकांना पाठबळ देताना त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यातही आ.रोहित पवार पुढे आहेत.त्यामुळेच आ.रोहित पवार प्रत्येक सुख दुःखात तसेच अडचणीच्या काळात तालुक्यातील युवा फळी कायम सावलीप्रमाणे त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे.निवडीनंतरसागर गंगावने म्हणाले , देशाचे नेते शरदचंद्र पवार व महाराष्ट्राचे युवा नेते आ.रोहित पवार यांचा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे.त्यांचे कार्य व महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान घराघरात पोहचिवण्याचे काम मी व माझ्यासोबत असलेल्या युवांनी आजपर्यंत केले आहे.या निवडीमुळे हे काम आणखी जोमाने करण्याची ऊर्जा मिळाली आहे.यापुढेही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

सदर निवडीबद्दल गुलाब काका तनपुरे , किशोर तापकीर , रघु आबा काळदाते , पूजाताई सूर्यवंशी , संतोष साहेबराव गंगावणे , अक्षय साबळे , किशोर गंगावणे , योगेश गंगावणे , किरण गंगावणे , विकी जगधने , गणेश नलवडे , मोनू गंगावणे, काळू गंगावने आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .