पिंपरी चिंचवड मध्ये प्रेम व पाऊस या काव्य अविष्कार थिएटर शो चे आयोजन

Google search engine

 

नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे द्वारे प्रेम व पाऊस या काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले. हा काव्य अविष्कार शो रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह , चिंचवड, पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती कृष्ण कुमार गोयल यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध निवेदक व साहित्यिक मा.श्रीकांत चौगुले, गझलकार म.भा.चव्हाण, साहित्यिक नाईक मॅडम तसेच नक्षत्राच देण काव्य मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील २७ मान्यवर कवींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये सुपे, ता. कर्जत,जि. अहमदनगर येथील कवी रामदास अवचर यांचाही समावेश होता. त्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या काव्य शो ने रसिकांची मने जिंकली. या मैफलीचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले.

कर्जत व कर्जत तालुक्यातील मान्यवर व नवोदित कवींना या पत्राद्वारे आव्हान करण्यात येते की या काव्य मंच द्वारे दरवर्षी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. निवड झालेल्या कवींना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह शाल व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात येते. हे संस्थेचे २५ वे वर्ष असल्याने जास्तीत जास्त कवींनी भाग घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.

श्रावण व निसर्ग या विषयावर दोन कविता १० सप्टेंबर पर्यंत मागवण्यात येत आहेत.शिवाय कवींच्या पुस्तक प्रकाशनाला ही मोठा वाव आहे.

कविता पाठविण्याचा पत्ता –

प्रा. राजेंद्र सोनवणे

अध्यक्ष- नक्षत्राचं देणं काव्यमंच,

साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरी, पुणे, ४११०३९.