साईकृपा कृषि महाविद्यालय , घारगाव येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Google search engine

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान,घारगाव संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय घारगाव येथे आज १५ ऑगस्ट रोजी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन आदरणीय सिंधु(आक्का) पानसरे तसेच विशेष निमंत्रित म्हणुन बाळासाहेब(तात्या) पानसरे हे उपस्थित होते. मान्यावरांच्या हस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी विविध विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा  गौरव करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्रातील मोडुल च्या स्टाॅलचे अनावरण श्रीमती सिंधु आक्का पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे समालोचन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. यावेळी साईकृपा कृषि महाविद्यालय तसेच श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव आदरणीय अर्चनाताई पानसरे मॅडम तसेच रजिस्टार कल्याण शिंदे सर व साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.