साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव तर्फे कृषि मेळावा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 

Google search engine

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्राम विकास प्रतिष्ठान, घारगाव संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय घारगाव आयोजित कृषि मेळावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन उद्या दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी ठिक सकाळी १०:०० वाजता सिद्धेश्वर मंदिर , आढळगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री. दत्तकृपा शैक्षणिक संकुल चे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे व सचिव अर्चनाताई पानसरे , तसेच मा. श्री. दिपक सुपेकर (तालुका कृषि अधिकारी, श्रिगोंदा), मा. श्री. मनोज सुर्यवंशी (मंडळ कृषी अधिकारी, श्रीगोंदा ) व तसेच मा. श्री. प्रभू देवकाते ( कृषी सहाय्यक, आढळगाव) उपस्थीत असणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मा. श्री. प्रविण ननावरे (ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरी, फलटण) मा. श्री. समीर डोंबे (पवित्रक, अंजिर प्रक्रिया उदयोग, दौंड), मा. श्री. प्रतिक मोर (डेवलपमेंट मॅनेजर वेस्टर्न रीजन), मा. श्री. केतन भोंगळे (स्काय ऐग्रो, बारामती) व तसेच मा. श्री. नंदकुमार खैरे (सुरभी बायो केयर, बारामती), मा. श्री. महेश रूपनवर (आत्मा, दौंड) आणि मा. श्री. माऊली हिरवे (प्रगतशील शेतकरी, पारगाव सुद्रिक ) लाभणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूनो आपल्या सर्व शंकांच निरसन करण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे अशी विनंती.

तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर निंबाळकर (प्राचार्य, साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव) तसेच प्रा. आकाश दळवी (रावे, कार्यक्रम अधिकारी), प्रा. रचना घोडके (रावे, कार्यक्रम समन्वयक) व प्रा. राहुल घोडके (रावे, कार्यक्रम अधिकारी) उपस्थित राहणार आहेत

या कार्यक्रमासाठी श्री. दत्तकृपा शैक्षणिक संकुल चे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम व संस्थेचे उपाध्यक्ष श्री. साळुंखे सर तसेच संस्थेचे रजिस्टर श्री.कल्याण शिंदे उपस्थित राहणार आहेत.