श्रीगोंदा तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी सचिन जामदार यांची निवड, रुईगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने केला सत्कार

Google search engine

 

श्रीगोंदा तालुक्यातील क्रीडा शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी सचिन जामदार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते वांगदरी येथील शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटी तसेच समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजी आण्णा पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक नंदाराम जामदार, सेवा सोसायटी चेअरमन शिवाजी पवार, माजी सरपंच अशोक पवार, सेवा संस्थेचे माजी चेअरमन सुनील दादा पवार, माजी उपसरपंच प्रकाश जामदार, बारकु काळे, रंगनाथ रजपुत यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी येथील ग्रामस्थांनी जामदार सर यांचा नागरी सत्कार केला. यावेळी युवा उद्योजक नरसिंग पवार, किशोर जामदार सर, निलेश पवार, योगेश जामदार, दत्ता जामदार, नितीन पवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कार समारंभात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.