दादा पाटील महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र् लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

Google search engine

 

दादा पाटील महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र् लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. शितल लालासाहेब घालमे, वनस्पतीशास्त्र विभागाची सोनाली बाळराजे जगताप, रसायनशास्त्र विभागातील किशोर काळे या तीन विद्यार्थ्यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. तसेच अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी प्रवीण लालासाहेब घालमे, भूगोल विभागाचा आनंद खुळे याची राज्य राखीव पोलीस दलात, भौतिकशास्त्र विभागाची शुभांगी राऊत तलाठी, माधुरी राऊत व मुक्ता देवकाते यांची जलसंपदा विभागामध्ये नुकतीच कॅनॉल इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे.

 

विशेष म्हणजे शितल घालमे ही ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर आली आहे. एकाच दिवशी शितल व प्रवीण या बहीण भावाची शासकीय पदावर झालेली निवड हा महाविद्यालयासाठी अभिमानाचा व कौतुकाचा विषय ठरलेला आहे

 

विविध शासकीय पदावर भरती झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या ‘स्पर्धा परीक्षा विभागाचा’ लाभ होत असल्याचे भरती प्राप्त विद्यार्थ्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून झालेली विविध व्याख्याने, अभ्यासिका व निरंतर चालू असलेले मार्गदर्शन याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे. याशिवाय महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. संजय नगरकर व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन वेळोवेळी सदर विद्यार्थ्यांना लाभते.

 

विविध शासकीय पदांवर भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले