
कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची खेळाडू राजकन्या राहूल नवले व अंतरा प्रभास देशपांडे यांनी १३ व १४ जुलै रोजी सातारा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ‘गटका’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. अमृतसर (पंजाब) येथे संपन्न होणाऱ्या ‘गटका’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. गटका हा खेळ ‘खेलो इंडिया’ मध्ये खेळला जातो. सदर खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ व श्री. संदीप पांढरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
राजकन्या नवले व अंतरा देशपांडे यांच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. सुनील देशमुख, प्रा. जयदीप खेतमाळीस, प्रा. अश्विनी यादव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






