सोयाबीन पिकावर अळयांचा प्रादुर्भाव

Google search engine

 

आधीच सोयाबीनचा पेरा या भागात कमी असून पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून सोयाबीनची पेरणी केली. त्यावरही अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाल्यास शेतकरी पुरता उद्‌ध्वस्त होऊ शकतो. सोयाबीनवर आता अळ्या दिसत आहेत. सोयाबीनच्या झाडांची पाने अळ्या खात असल्यामुळे सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. या अळ्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी दिसून येतात. घारगाव भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याची तक्रार प्राप्त होताच शेतात पाहणी केली. काही प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. पण, त्याला घाबरण्याचे कारण नसून जेथे या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्या सोयाबीन पिकावर प्रोफेलोफाकस 50 टक्‍के प्रवाही 20 मिलि व टृमझोफॉस 40 टक्‍के प्रवाही 12.50 मिलि 10 लिटर पाण्यात मिळवून सोयाबीन पिकावर फवारणी केल्यास या अळीचा नायनाट करता येतो. जेथे या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच बांधावर कृषी अधिकारी वेळोवेळी यानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

 

कृषीदूत : शुभम ढोले

(कृषी महाविद्यालय, घारगाव)