विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदें साहेब यांनी घेतली तापकीर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

0
295
Google search engine

कर्जत तालुक्यातील खांडवी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्या निवासस्थानी काल रविवारी (दि. १५) रोजी प्रा.राम शिंदे साहेब यांनी भेट देत तापकीर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

काकासाहेब तापकीर यांच्या मातोश्री कै. पार्वती लक्ष्मण तापकीर यांचे वृद्धापकाळाने नुकतेच दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबीयांची विचारपूस करून दुःखाच्या प्रसंगी धैर्याने उभे राहण्याचे शब्द दिले. त्यांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, कर्जतचे उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, भाजप तालुकाध्यक्ष अनिल गदादे, मा. पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे, अशोक खेडकर, शेखर खरमरे, संपत बावडकर, सरपंच प्रविण तापकीर, नंदलाल काळदाते, लक्ष्मण तापकीर, तान्हाजी अनभुले, भाऊसाहेब गावडे, हरिदास केदारी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान सामाजिक, राजकीय शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही काकासाहेब तापकीर यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.