
नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालात येथील रयत शिक्षण संस्थेच्या, सौ.सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवी मध्ये तालुक्यात सर्वाधिक १८ विद्यार्थिनी कन्या विद्यामंदिरच्या शिष्यवृत्ती धारक झाल्या आहेत. इयत्ता आठवीच्या ११ विद्यार्थिनी तर इयत्ता पाचवीच्या ७ विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी झाल्या आहेत. सलग चार वर्षांपासून तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होण्याचा मान विद्यालयाने मिळविला आहे.शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशात विद्यालयाचे सातत्य सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे –
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी : प्रणिती कोकाटे ,ईश्वरी झिटे ,ईश्वरी भूकन,ईश्वरी दिवटे,आकांक्षा कांबळे समीक्षा अनारसे,श्रीनी गुंजकर
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी : तेजस्विनी सुरवसे ,ऋतुजा दुतारे,श्रावणी धांडे,सिद्धता हजारे ,अदिती पवार ,श्रुती नेटके, सई जगताप,अवंती तनपुरे ,कार्तिकी रोकडे ,मृणाली शिंदे ,मृण्मयी तांदळे
विद्यालयाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आमदार रोहित पवार,जनरल बॉडी सदस्य राजेंद्र फाळके,जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुवर्णा सोनमाळी,स्वाती पाटील,शबनम इनामदार,विभागीय अधिकारी , विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका इर्शाद पठाण,प्रभारी मुख्याध्यापक सुरेश भोयटे यांनी विशेष अभिनंदन केले .
प्रतिक्रिया :-
विभाग प्रमुखांना दिलेले स्वातंत्र,स्पर्धा परीक्षांची नियोजनबद्ध तयारी आणि भरपूर सराव या जोरावरच वर्षभरातील सर्वच शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
– इर्शाद पठाण (माजी मुख्याध्यापिका)






