सदगुरु विमा सेवेमार्फत सर्व प्रकारच्या विमा व गुंतवणूक योजना उपलब्ध , कर्जत, पुणे येथील ग्राहकांसाठी विश्वासार्ह सेवा

Google search engine

 

कर्जत , पुणे परिसरातील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या विमा सेवा, आरोग्यविमा, गुंतवणूक आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा देणाऱ्या योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देणारी सदगुरु विमा सेवा ही विश्वासार्ह संस्था म्हणून लोकांच्या मनात वेगाने स्थान मिळवत आहे.

प्रा. सुनील तोरडमल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सर्वसामान्य ग्राहकांपासून व्यवसायिकांपर्यंत सर्वांना योग्य योजना सुचवण्याचे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे करत आहे.

आजच्या वेगवान आणि अनिश्चिततेने भरलेल्या जीवनात आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकाची प्राथमिक गरज बनली आहे. घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यापासून ते भविष्यातील मुलांच्या शिक्षणापर्यंत, निवृत्तीपर्यंतचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी योग्य योजना निवडणे अत्यंत आवश्यक आहे. सदगुरु विमा सेवेमार्फत म्युच्युअल फंड, एसआयपी, मेडिक्लेम पॉलिसी, आरोग्य विमा योजना, मुदत विमा, जीवन विमा तसेच विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना उपलब्ध करून दिल्या जातात.

विशेष बाब म्हणजे, आयुर्विमा महामंडळ (LIC), स्टार हेल्थ, HDFC ERGO, केअर हेल्थ, मणिपाल सिग्ना यांसारख्या विश्वासार्ह आणि देशातील अग्रगण्य विमा कंपन्यांच्या योजना येथे एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने मिळतात. ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार योग्य पॉलिसी निवडण्यात तज्ज्ञ मार्गदर्शन, तसेच क्लेमसेटलमेंट प्रक्रियेत आवश्यक ती मदत देण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे.

प्रकल्प प्रमुख प्रा. सुनील तोरडमल पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून विमा क्षेत्रात कार्यरत असून प्रामाणिक सेवा, ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो कुटुंबांनी आपले आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवले आहे.

कर्जत , पुणे येथील नागरिकांनी या सेवांचा लाभ घेण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

मोबाईल: ८६२३९३२८९० / ९८३४६९२१५४

सदगुरु विमा सेवा – आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी विश्वासू साथी!