
आज अखंड हरिनाम सप्ताह निमित्त माननीय राम शिंदे साहेब, सभापती – विधान परिषद महाराष्ट्र यांनी गाव भेट देऊन सदिच्छा दौरा केला.
श्री सरपंच अनिल अशोक खराडे यांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या वेळी कर्जत–शिंदेवाडी व बाजारखिळा–कापरेवाडी रस्त्यासाठी सुमारे ₹५ कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कापरेवाडी–कोरेगाव रस्ता, कर्जत शहरातील पर्यायी मार्ग, तसेच पाझरलाव या महत्त्वाच्या विकासकामांची मागणी सरपंच अनिल खराडे यांनी साहेबांकडे केली.
त्यावर साहेबांनी सांगितले की, “यापुढे कापरेवाडी–शिंदेवाडी परिसरातील आवश्यक सर्व विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल.”
कार्यक्रमास प्रवीणदादा घुले, राजेंद्रआबा म्हस्के, काकासाहेब शिंदे, शेखर खरमारे, अनिल गदादे, काकासाहेब धांडे, मंगेशदादा जगताप, पप्पु धोदाड , दत्ता मुळे ,श्री शेळके ,नंदलाल काळदाते, गणेश काळदाते, तसेच कापरेवाडी–शिंदेवाडीचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






